
योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत सगळेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे. अशात बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खानसुद्धा नेहमी योगा करण्यावर भर देते.

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करीना योगावर भर देते. शिवाय ती नेहमी तिचे योगा सेशन चाहत्यांसाठीसुद्धा शेअर करते.

प्रेग्रंसीच्या काळात करिना नियमीत योगा करण्यावर भर देत होती. तिचं प्रेग्नंसीमधील हे फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं.

नुकतंच काही महिन्यांपूर्वी करीनानं दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या दरम्यान करीनाचं वजन वाढलं होतं त्यामुळे आता ती वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.

तिचे हे योगा सेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.