
83 या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे, जे 1983 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे कर्णधार होते.

पंजाबी गायक, अभिनेता आणि निर्माता एमी विर्क या चित्रपटात बलविंदर संधूची भूमिका साकारत आहे. बलविंदर हे एक दिग्गज गोलंदाज होते.

साहिल खट्टर या चित्रपटात सय्यद किरमानीची भूमिका साकारत आहे, सय्यद हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम यष्टिरक्षक होते.

मराठी अभिनेता आणि संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील या चित्रपटात त्यांच्या वडिलांचीच भूमिका साकारत आहे. संदीप पाटील जितके चांगले फलंदाज आहेत, तितकेच ते एक उत्तम गोलंदाजही आहेत.

ताहिर राज भसीन या चित्रपटात सुनील गावस्कर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. वेगवान गोलंदाजी कशी हाताळायची हे सुनील यांना चांगलेच माहीत होते.

या चित्रपटात साकिब सलीम मोहिंदर अमरनाथची भूमिका साकारणार आहे. मोहिंदर अंतिम आणि उपांत्य फेरीत सामनावीर ठरला होते.

पंजाबी गायक हार्डी संधू मदन लाल सिंह यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मदनलाल यांच्या गोलंदाजीचे सगळेच चाहते होते.

दक्षिण भारतीय अभिनेता आर बद्री सुनील वॅल्सन यांची भूमिका साकारणार आहे.

आदिनाथ कोठारे या चित्रपटात दिलीप वेंगसरकर साकारताना दिसणार आहे. कपिल देव यांच्यानंतर दिलीप भारतीय संघाचे कर्णधार झाले.

सेक्रेड गेम्सचा स्टार जतीन सरना या चित्रपटात यशपाल शर्माच्या भूमिकेत दिसणार आहे. यशपाल शर्मा हे अव्वल फलंदाज ठरले आहेत.

धैर्य करवा या चित्रपटात रवी शास्त्रींच्या भूमिकेत दिसणार आहे.

निशांत दहिया या चित्रपटात अष्टपैलू रॉजर बिन्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

पंकज त्रिपाठी त्यावेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक मानसिंह यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.