
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमा... 2023 ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. नुकताच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे.

'लापता लेडीज' सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. दोन नवविवाहित तरूणी, लग्नानंतर त्यांची होणारी अदलाबदल अन् त्यानंतर घडत जाणाऱ्या घटना यावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात जया आणि फुलकुमारी ही पात्र तुम्हाला लक्षात राहतात.

जया आणि फुलकुमारी ही पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कशा दिसतात? त्यांचं रूप पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. जया आणि फुलकुमारी पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रींचे हे फोटो पाहून तुम्हालाही विश्वास बसत नाही ना?

'लापता लेडीज' या सिनेमातील जया... जयाच्या भोवती सिनेमाच्या शेवटापर्यंत संशयाची सुई राहाते.सिनेमात साधी दिसणारी जया खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. जया पात्र साकारणारी अभिनेत्री प्रतिभा रंता...

फुलकुमारी पात्र साकारणारी नितांशी गोयल... नितांशी गोयल ही सिनेमात अत्यंत साधी आणि शांत वाटते. पण खऱ्या आयुष्यात ती प्रचंड ग्लॅमरस आहे.