
क्रिती सॅनॉन बॉलिवूडमधील एक प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री आहे. क्रितीनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की क्रिती इतकीच सुंदर आणि लुकनंही सारखी असलेली एक हॉलिवूड अभिनेत्री आहे तिचं नाव आहे सारा कॅनिंग.

सारा कॅनिंग ही एक कॅनेडियन अभिनेत्री आहे आणि तिनं अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सारानं ‘व्हँपायर डायरीज’ या लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे. सारानं आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये केली होती, तर क्रितीनं आपल्या करियरची सुरूवात 2014 मध्ये केली होती.

सारा आता अनेक मोठ्या आणि हिट शोमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे क्रिती, मिमी, भेडिया, आदिपुरुष आणि बच्चन पांडेमध्ये दिसणार आहेत.