
अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. मात्र तिच्या सारखी दिसणारीसुद्धा एक व्यक्ती आहे.

दीपिकासारख्या दिसणार्या या अभिनेत्रीचे नाव आहे अमाला पॉल, ही दक्षिणेची अभिनेत्री आहे. ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते.

अमाला पॉलनं तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जेव्हा अमलानं इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा दीपिकासारख्या लुकमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

अमाला एक अतिशय हुशार अभिनेत्री आहे. तिनं अनेक वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे.

अमालानं स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती दीपिकासारखी दिसते ही चांगली गोष्ट आहे. ती म्हणाली होती, दीपिका खूप सुंदर आहे.