AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026, Super 8 Point Table : सुपर 8 फेरीत इंग्लंडचा एकाच वेळी तीन संघाना धक्का, झालं असं की..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला धावांनी पराभूत केलं. या सुपर 8 फेरीतील गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. एकाच विजयात तीन संघांना धक्का दिला आहे.

T20 WC 2026, Super 8 Point Table : सुपर 8 फेरीत इंग्लंडचा एकाच वेळी तीन संघाना धक्का, झालं असं की..
सुपर 8 फेरीत इंग्लंडचा एकाच वेळी तीन संघाना धक्का, झालं असं की..Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Feb 22, 2026 | 6:44 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत इंग्लंडने श्रीलंकेला 51 धावांनी पराभूत केलं. खरं तर पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी पाहून श्रीलंका सहज जिंकेल असं वाटत होतं. पण निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला. इंग्लंडने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं. इंग्लंडने श्रीलंकेसमोर विजयासाठी 146 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना श्रीलंकेला फक्त 95 धावा करता आल्या. या सामन्यात श्रीलंकेचा 51 धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेचा नेट रनरेट कमालीचा घसरला आहे. तर इंग्लंडला जबर फायदा झाला आहे.  इंग्लंडचा सुपर 8 फेरीतील उर्वरित दोन सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध आहे. यापैकी एक सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील जागा पक्की होणार आहे. पण इतर संघांचं गणित मात्र बिघडलं आहे.

सुपर 8 फेरीच्या गुणतालिकेत काय झालं?

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. श्रीलंकेचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना इंग्लंडशी झाला. हा सामना इंग्लंडने जिंकला. या विजयासह गट 2 मधील गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहेत. कारण  इंग्लंडने विजय मिळवून सुपर 8 फेरीतील गट 2 गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. यासह श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड यांना मोठा धक्का बसला. इंग्लंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाट सुकर झाल्याचं दिसत आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला उपांत्य फेरीसाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये इंग्लंडचा संघ 2 गुण आणि +2.550 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पहिला सामना पावसामुळे झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण विभागून देण्यात आला. तसेच नेट रनरेट हा 0 आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे खात्यात एकही गुण नाही. उलट नेट रनरेट हा -2.550 इतका झाला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही. जर श्रीलंकेने दोन पैकी एक सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा