
मानुषी हिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत सिनेमात झळकल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत वाढ झाली. पण अद्याप मानुषीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलेलं नाही.

मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चर्चा रंगल्या आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी मानुषी छिल्लर एका व्यावसायिकाला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. पण यावर अभिनेत्री अधिकृत वक्तव्य केलं नाही.

सोशल मीडियावर देखील मानुषी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मानुषी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.