
चित्रपट किंवा मालिकेतल्या भूमिकेसाठी कलाकारांना अनेकदा त्यांच्या लूकमध्ये, शरीरयष्टीत आवश्यक ते बदल करावे लागतात. अनेकदा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने मालिकेतील भूमिकेसाठी अत्यंत वेगळा लूक केला आहे.

अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणंही कठीण आहे. ही अभिनेत्री 'आई मायेचं कवच' या मालिकेत मिनाक्षीची भूमिका साकारणारी भार्गवी चिरमुले आहे.

भार्गवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या लूकचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना थक्क केलं आहे.

तिचा हा लूक पाहून चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील इतर कलाकारसुद्धा थक्क झाले आहेत. 'हाय हॉटी' अशी कमेंट क्रांती रेडकरने केली आहे. तर भार्गवीचा कधीही न पाहिलेला हा लूक पाहून नंदिता पाटकरने 'आयच्या गावात' असं म्हटलं आहे.

'आई मायेचं कवच' या मालिकेत मिनाक्षी सुहानीला शोधण्यासाठी नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

बेपत्ता असलेल्या सुहानीच्या शोधात असताना तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. आता मीनाक्षी सुहानीपर्यंत कशी पोहोचेल हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.