
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्य आणि तिच्या तेजाज्ञा या ब्रँडमुळेच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

आता तेजस्विनीनं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं स्वत:च्या ब्रँडची क्लासी साडी परिधान केली आहे.

या साडीमध्ये तेजस्विनी कमालीची सुंदर दिसतेय. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.

'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा सध्या चांगलाच दबदबा पाहायला मिळतोय. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे आता ट्रेंडमध्ये आहेत.

नवीन ट्रेंड्सला जुन्या स्टाईलचा टच या कपड्यांमध्ये पाहायला मिळतोय. या ब्रँडसोबत अभिनेत्री अभिज्ञा भावे सुद्धा जोडलेली आहे. ती सुद्धा या ब्रँडसाठी खास फोटोशूट करत असते.