
मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता यांचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे हा फोटो जमिनीपासून तब्बल 17000 फूट उंचीवर घेण्यात आलायं. ज्यामध्ये मिलिंद सोमण यांनी पत्नी अंकिताचे पाय धरलेले दिसत आहेत.

मिलिंद सोमण यांनी पत्नीचे पाय नेमके कशामुळे धरले याची चर्चा आता रंगू लागलीयं. मिलिंद यांची पत्नी अंकिताचा वाढदिवस होता आणि मिलिंदने अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनी काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

मिलिंदने शेअर केलेले फोटो लडाखमधील आहेत. अंकिताला रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मिलिंद सोमणने लिहिले की, मला माहित आहे की काल तुझा वाढदिवस होता. मी तिथे होतो आणि समुद्रसपाटीपासून 17 हजार फूट उंचीवर किती छान सुरुवात झाली. I Love You...

अंकिता आणि मिलिंद अनेकदा इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करतात. मिलिंद आणि अंकिताच्या वयात खूप फरक आहे, पण दोघांमध्ये खूप प्रेम आहे. या जोडीवरून कळते की, प्रेमाला वयाचे नक्कीच बंधण नाहीयं.

मिलिंद सोमण लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. कंगना राणौत दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद सोमण सॅम माणेकशॉची भूमिका साकारणार आहेत.