
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने (Kriti Sanon) ‘हीरोपंती’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर क्रितीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

क्रितीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. लवकरच ती प्रभासबरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यादरम्यान क्रितीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

तर पंकज त्रिपाठीसोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन 'मिमी' चित्रपटात दिसणार आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. खुद्द क्रिती सेनॉनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

फिल्म स्टार्सची फॅशन नेहमीच उत्तम असते. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने ही आता तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्रिती कमालीची सुंदर दिसत आहे. क्रितीनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती ग्लॅमरस अवतारात दिसली आहे. तिनं गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.