
स्टार प्लसचा आगामी शो, ‘चीकू की मम्मी दूर की’ आपल्या पहिल्या प्रोमोपासूनच सर्वांचं लक्ष्य वेधून घेत आहे. हा शो आई-मुलीचं प्रेमळ नातं दाखवतो आणि त्यांच्यामध्ये नृत्य हा समान धागा आहे.

स्टार प्लसनं आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक धमाका करण्याचा निर्णय घेतला आहे!!

शोच्या निर्मात्यांनी 'चीकू की मम्मी दूर की'च्या नवीनतम प्रोमोसाठी प्रतिष्ठित डिस्को डांसर, मिथुन चक्रवर्ती यांना सहभागी करून घेतले आहे. डांस शो असल्याकारणाने, या प्रोमोची शोभा वाढवण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांच्यापेक्षा योग्य नाव आणखी कोणते असू शकेल?

इथपर्यंत की परिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति या शोच्या मुख्य कलाकारांना देखील मिथुन आपल्या शोसोबत जोडले जात आहेत, हे बघून अत्यानंद होत आहे.

'चीकू की मम्मी दूर की'चा हा नवा प्रोमो मिथुनजींच्या तेजस्वी व्यक्तित्व आणि आकर्षक आवाजात इतका आकर्षक वाटतोय की चाहते शोच्या लॉचिंगची आतुर्तेनं वाट पाहात आहेत.