
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाला आता प्रत्येक जण ओळखतोच. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी मोनालिसा तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

मोनालिसा दररोज तिच्या चाहत्यांसाठी स्वतःचे खास फोटो शेअर करत असते. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलेली मोनालिसा अनेकदा चाहत्यांना वेड लावते.

तिचे फोटो चाहत्यांच्या खास पसंतीस उतरतात. सोशल मीडियावर तिचे फोटो येताच ते व्हायरल होतात.

सध्या मोनालिसा नवऱ्यासोबत मालदीवची सफर करतेय. नुकतंच तिनं तिच्या या ट्रीपचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मोनालिसा वाळूमध्ये बसून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. चाहत्यांनाही तिची ही स्टाईल पसंतीस उतरत आहे.