
मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिनं नुकतंच तिचे काही फोटो ऑल ब्लॅक लूकमध्ये शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीचा ऑल ब्लॅक लुक आवडला आहे. या ब्लॅक ड्रेसमध्ये मौनीने अनेक पोज दिले आहेत.

मौनीनं लांब स्कर्टसह ब्लॅक क्रॉप टॉप कॅरी केला आहे. या ड्रेससोबतच तिनं ब्लॅक हील्स परिधान केली आहे. या आउटफिटमध्ये ती सुंदर दिसतेय.

या आउटफिटसह मौनीनं ब्लॅक कलरची हँड बॅग कॅरी केली आहे. तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये हा पोशाख सहजपणे कॅरी करु शकता.

नेहमीप्रमाणे मौनीचं फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर मौनी आलिया भट्ट, नागार्जुन, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे.