
मुंबई | 07 मार्च 2024 : 'आई कुठे काय करते!' मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारलेल्या अरुंधती हे पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

आता 'आई कुठे काय करते!' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अरुंधतीवर नवं संकट कोसळलं आहे. अरुंधतीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झालं आहे. काहीच दिवसांआधी या दोघांचं लग्न झालं होतं. मनू आणि मायासोबत ट्रिपला गेल्याचं मालिकेत दाखवलं आहे. त्यानंतर आता आशुतोषचं निधन झाल्याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

अरुंधतीच्या आयुष्यात आलेल्या या नव्या संकटामुळे अरुंधतीवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या संकटाच्या काळात कांचन तिच्या मदतीला आली आहे. आता यातून अरुंधती कसं सावरणार हे पाहावं लागेल.

‘आई कुठे काय करते!’ या मालिकेची वेळही बदलण्यात आली आहे. आधी ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होत होती. आता दुपारी 2:30 वाजता ही मालिका पाहता येणार आहे.