
अभिनेत्री पूजा सावंत... अभिनयामुळे चित्रपटसृष्टीत तिने वेगळी ओळख निर्माण केली. तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. 'कलरफुल' भूमिकांमुळे चाहत्यांच्या मनात ती घर करुन आहे.

अभिनेत्री पूजा सावंत ही लग्न करते आहे. सिद्धेश चव्हाण याच्यासोबत ती लग्नगाठ बांधत आहे. तिच्या लग्नातील कार्यकर्मांना सुरुवात झाली आहे.

मेहंदी सोहळ्याचे फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रंग माळीयेला... म्हणत मेहंदीचे खास फोटो तिने शेअर केलेत.

मेहंदीच्या कार्यक्रमाला पूजाने कलरफुल घागरा घातला होता. त्याला साजेशा ज्वेलरीमध्ये पूजाचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

सिद्धेशच्या नावाची मेहंदी हातावर लागल्यावर पूजाने खास फोटो शेअर केलेत. कलरफुल तू खूपच ब्युटीफुल दिसतीयेस, अशी कमेंट चाहत्याने या फोटोवर केलीय.