
अमिताभ बच्चन जरा हटके स्टाईल करताना दिसतात. त्यांचं असं ट्रेंडी आऊटफिट परिधान करणं आजही तरुणाईला भूरळ घातलं.

अमिताभ सध्या जॅकेट परिधान करताना दिसत आहेत. ते वेगवेगळ्या रंगाचे जॅकेट परिधान करत आहेत. त्यांचा हा लूक सध्या चर्चेत आहे.

वाढदिवसानिमित्त असंख्य चाहते अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर जमले होते. तेव्हा या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करण्यासाठी अमिताभ जलसा बंगल्याबाहेर आले.

अमिताभ यांनी हात जोडत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. त्यावेळीही अमिताभ यांनी हे ट्रेंडी जॅकेट घातलं होतं.

अमिताभ हे दोन दिवसांआधीही असेच चाहत्यांच्या भेटीसाठी जलसाबाहेर आले होते. यावेळीही असंच जॅकेट त्यांनी घातलं होतं. यावर तुमच्या पॅन्टची नाडी लटकतेय, असं एकाने म्हटलं.

यावर अमिताभ यांनी त्याला बिग बी स्टाईलने उत्तर दिलं. ते म्हणाले, ही नाडी नव्हे तर आजकालच्या पिढीची फॅशन आहे!, हा प्रसंग अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.