
यूट्यूबर प्राजक्ता कोळी हिने नुकतंच साखरपुडा केला आहे. बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत तिने एंगेजमेंट केली आहे.

आता तू माझा एक्स बॉयफ्रेंड आहेस, असं म्हणत प्राजक्ताने एंगेजमेंटचे फोटो शेअर केलेत.

प्राजक्ताने ही आनंदाची बातमी शेअर करताच या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

प्राजक्ता कोळी ही भारतात टॉप यूट्यूबर पैकी एक आहे. 'मिसमॅच्ड' या वेबसीरिजने तिला वेगळी लोकप्रियता मिळवून दिली. तर वृशांक हा पेशाने वकील आहे. त्याला गिटार वाजवायला आणि बास्केटबॉल खेळायला आवडतं.

कॉलेजमध्ये असल्यापासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावरही एकमेकांसोबतचे फोटो हे दोघे शेअर करत असतात. आता या साखरपुड्याच्या बातमीने या दोघांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.