AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs SLW : श्रीलंका सलग तिसऱ्या सामन्यात ढेर, टीम इंडियासमोर 113 धावांचं आव्हान

India Women vs Sri Lanka Women 3rd T20I : श्रीलंकेच्या फलंदाजांनी करो या मरो अशा सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेला 6 च्या रनरटेनही धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे भारताला विजयासाठी माफक आव्हान मिळालं आहे.

INDW vs SLW : श्रीलंका सलग तिसऱ्या सामन्यात ढेर, टीम इंडियासमोर 113 धावांचं आव्हान
Harmanpreet Kaur Shafali Women Team IndiaImage Credit source: bcci women X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 26, 2025 | 9:10 PM
Share

वूमन्स टीम इंडियाच्या चिवट बॉलिंगसमोर श्रीलंका सलग तिसऱ्या सामन्यातही (India vs Sri Lanka Women 3rd T20I) ढेर झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला पहिल्या 2 सामन्यात 130 पार पोहचून दिलं नव्हतं. त्यानंतर आता श्रीलंकेला तिसर्‍या सामन्यात 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 7 झटके देऊन 112 धावांवर रोखलं. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी फक्त 113 धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, यात शंका नाही. मात्र श्रीलंका या छोट्या धावसंख्येचा बचाव करताना कशी बॉलिंग करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाने पहिल्या दोन्ही सामन्यातही श्रीलंकेला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं होतं. श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्ध पहिल्या सामन्यात 121 तर दुसऱ्या टी 20i सामन्यात 128 धावा केल्या होत्या. भारताने हे विजयी आव्हान सहज पूर्ण केलं आणि सलग 2 सामने जिंकले. त्यामुळे श्रीलंकेसाठी तिसरा सामना हा करो या मरो असा झाला. श्रीलंकेला या अटीतटीच्या लढतीत 3 बदलांसह मैदानात उतरली. मात्र टीम मॅनेजमेंटला त्या बदलांचा श्रीलंकेच्या बॅटिंगवर अपेक्षित परिणाम पाहायला मिळाला नाही.

टीम इंडियासमोर श्रीलंका अपयशी

टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंका टीमकडून फक्त चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्यातही फक्त 3 फलंदाजांनाच 20 पार मजल मारता आली. श्रीलंकेसाठी इमेशा दुलानी हीने सर्वाधिक धावा केल्या. इमेशाने 32 चेंडूत 27 धावा जोडल्या. ओपनर हसिनी परेरा हीने 25 धावांचं योगदान दिलं. कविषा दिल्हारी हीने 20 धावा केल्या.

तर अखेरच्या क्षणी कौशनी हीने मालिकी मदारा हीच्यासह काही धावा जोडल्या. त्यामुळे श्रीलंकेला 100 पार पोहचता आलं. कौशनीने 16 बॉलमध्ये नॉट आऊट 19 रन्स केल्या. तर चौघींना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

टीम इंडियासमोर 113 धावांचं आव्हान

टीम इंडियाची बॉलिंग

टीम इंडियाकडून एकूण 6 खेळाडूंनी बॉलिंग केली. मात्र भारताच्या 2 गोलंदाजाच श्रीलंकेला पुरून उरल्या. भारतासाठी रेणुका सिंग, क्रांती गौड, दीप्ती शर्मा, वैष्णवी शर्मा, अमनजोत कौर आणि श्री चरणी यांनी बॉलिंग केली. या पैकी रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा या दोघींनीच या 7 विकेट्स घेतल्या. रेणूकाने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर दीप्तीने श्रीलंकेला 3 झटके दिले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...