
आज रंगपंचमी आहे... सगळीकडे होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. सगळेच जण रंग खेळताना पाहायला मिळतायेत. रंगांची उधळण करत हा सण खेळला जात आहे.

तुम्ही सैराट हा सिनेमा पाहिला असेल. या सिनेमातील काही सिन आजही मनात घर करून आहेत. यातलाच हा एक सिन... रंगपंचमी खेळतानाचा हा सिन आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे.

'सैराट' सिनेमातील सैराट झालं जी या गाण्यातील हा सिन आहे. गावातली रंगपंचमी यात दाखवण्यात आली आहे. आर्ची आधी परशाला रंग लावते. मग परशाही आर्चीला रंग लावतानाचा हा सिन आहे.

सल्या आणि लंगड्या हे परशाचे जीवलग मित्र... हे दोघे परशाला रंग लावतात. हाच तो सिन... या सिनमुळे सैराट सिनेमात आणखी जान आली आहे.

सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शेअर केलेला हा फोटो... रंगपंचमीच्या सिननंतर सल्या आणि लंगड्यासोबत नागराज मंजुळे यांचा हा खास फोटो...