
'चला हवा येऊ द्या' प्रसिद्ध रिअॅलिटी शो... हा कार्यक्रम पाहिला नाही, असा क्वचितच कुणी असेल. झी मराठीवरचा हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला. दहा वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम आणि प्रेक्षकांचं वेगळं नातं होतं. या कार्यक्रमात श्रेया बुगडे हिचं स्थान अढळ होतं. तिने तिच्या कामाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

'चला हवा येऊ द्या' मध्ये श्रेयाने वेगवेगळी स्किट केली. तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडायचा. तिने सादर केलेली स्किट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 'चला हवा येऊ द्या' नंतर श्रेया आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला येतेय.

अभिनेत्री श्रेया बुगडे हिला तुम्ही आता BIG FM वर ऐकू शकता. 'बिग हा हा हा कार' हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन श्रेया पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत BIG FM वर श्रेयाला तुम्ही ऐकू शकणार आहात. सोशल मीडियावर श्रेयाने याबाबत पोस्ट शेअर केलीय. अनेकांनी तिला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.