
नोरा फतेही नेहमीच चर्चेमध्ये असते. नोराने तिच्या डान्समुळे चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळे ओळख निर्माण केली आहे. नोराचा फॅशन सेन्स देखील जबरदस्त आहे.

डान्सरनंतर अभिनेत्री बनलेल्या नोराने अलीकडेच कोरसेट्स, पँटसूट आणि प्रिंटेड को-ऑर्ड्स कॅरी केले आहे. नोरा व्हिंटेज पँटसूट आणि कोरसेट्समध्ये दिसली.

या सुंदर आउटफिटमध्ये नोराचा लूक जबरदस्त दिसत आहे. या आउटफिटसोबत नोराने एकदम महागडी चप्पल देखील घातली आहे. या चप्पलची किंमत अंदाजे 57,552 रुपये इतकी आहे.

नोरा नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नोराचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात.

रॉकी हँडसम’, ‘सत्यमेव जयते’, ‘बाटला हाऊस’ इत्यादी सिनेमांमध्ये तिने तिच्या नृत्याने चार चांद लावले आहेत. नोरा तिच्या नृत्य शैलीसाठी संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.