
अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. खुद्द सोनम हिने स्वतःचं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोनम हिने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते देखील फिदा झाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

सोनम कपूर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 'कोण म्हणेल हिला एका मुलाची आई..' अशी कमेंट अनेकांनी सोनमच्या लूकवर केली आहे.

आई झाल्यानंतर सोनम हिने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेत्री तिचा पूर्ण वेळ मुलगा वायू आणि कुंटुबाला देत आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियवर कायम सक्रिय असते.

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते.