
ऑस्कर 2022 खूप खास आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे यावेळी चाहत्यांनाही या पुरस्कार सोहळ्यात वोट करता येणार आहे. विश्वास बसत नाहीये ना? मात्र, होय हे अगदी खरे आहे...यावेळी चाहते देखील पुरस्कारासाठी वोट करू शकणार आहेत.

पुढच्या महिन्यात ऑस्कर फॅन फेव्हरेट प्राइज आयोजित करेल. ज्यामध्ये चाहते सर्वात फेमस चित्रपटाला वोट करू शकतात. चाहते ट्विटरद्वारे वोट करू शकतात.

ऑस्करचे टीव्ही रेटिंग बऱ्याच दिवसांपासून कमी होत आहे, त्यामुळे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी सोहळ्याच्या आयोजकांनी ही खास रणनिती आखली असल्याचे बोलले जात आहे.

27 मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे. पहिल्यांदाच आता चाहते पुरस्कारासाठी वोट करणार आहेत हे सर्वात विशेष आहे.

भारतातील 'द राइटिंग विद फायर’ या डॉक्यूमेंट्री चित्रपटाला 94व्या अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले आहे.