
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा यांना पहिल्यांदा एकत्र पाहिल्यानंतर दोघांच्या नात्याने जोर धरला. आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा यांचीच चर्चा आहे. दोघे लवकरचं रोका करतील अशी देखील चर्चा रंगत आहे. पण त्यांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लग्नाच्या चर्चा सुरु असताना परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा यांना पुन्हा मुंबई विवामतळावर स्पॉट करण्यात आलं. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.


अभिनेत्रीचे वडील पवन चोप्रा म्हणाले, ‘आता त्यांच्या त्यांच्या नात्यावर बोलणं योग्य ठरणार नाही…’ एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे.