
२४ सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव यांचा शाही थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे. आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. राघव आणि परिणीती यांना आशीर्वाद देण्यासाठी पाहुणे देखील उदयपूर याठिकाणी पोहोचले आहेत.

उदयपूर याठिकाणी परिणीती आणि राघव यांचं देखील जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होवू नये म्हणून खास बंदोबस्त करण्यात आला आहे. पाहुण्यांच्या मोबाईलवर निळ्या रंगाची टेप लावण्यात आली आहे.

निळ्या रंगाच्या टेपचं खास वैशिष्ट्य आहे. टेप मोबाईलला लावल्यानंतर जर कोणी काढण्याचा प्रयत्न केला, तर टेप काढणाऱ्याला क्षणात पकडलं जाईल. तीन दिवस लग्न सोहळा रंगणार आहेत.

तीन दिवस लग्न सोहळ रंगणार असल्यामुळे हॉटेलच्या बाहेर एकही स्टाफ जावू शकत नाही. हॉटेल स्टाफच्या मोबाईलवर देखील निळ्या रंगाची पट्टी लावण्यातआ आली आहे. तर राघव आणि परिणीती यांच्या लग्नात फोटो आणि व्हिडीओ काढण्याची परवाणगी नाही..

सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता परिणीती आणि राघव यांना पत्नी - पतीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.