
अनन्या पांडेने आतापर्यंत मोजकेच चित्रपट केले आहेत. पण ती अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहते आणि याचे एक खास कारण म्हणजे तिचा फॅशन सेन्स.

अलीकडेच अनन्याने फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनन्याने हे फोटोशूट कारमध्ये केले आहे.

अनन्याने फोटोशूटसाठी प्रिंटेड वेलवेट ड्रेप ड्रेस कॅरी केला होता. अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सेक्सी दिसत आहे.

विशेष म्हणजे अनन्याचा हा ड्रेस डिझायनर लेबल निरमूहाचा आहे. ज्याची किंमत 22 हजार रुपये आहे.

अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती पती, पत्नी और ती आणि खली पीलीमध्ये दिसली.