Prakash Raj: सिंघममधल्या ‘जयकांत शिक्रे’नं वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी केलं लग्न; लग्नापूर्वी घेतली मुलींची परवानगी

| Updated on: Mar 26, 2022 | 7:30 AM

अभिनेते प्रकाश राज यांनी दाक्षिणात्य चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 'सिंघम' या चित्रपटात त्यांनी साकारलेली जयकांक शिक्रेची भूमिका खूपच गाजली. भूमिका खलनायकी असो वा सकारात्मक.. आपल्या अभिनयाने ते प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात.

1 / 7

2 / 7
आजवर त्यांनी तेलुगू, कन्नड, हिंदी, मल्याळम या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच क्वचित लोकांना माहित असेल. प्रकाश राज यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

3 / 7
1994 मध्ये त्यांनी ललिता यांच्याशी लग्न केलं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. ललिताला घटस्फोट दिल्यानंतर प्रकाश यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी लग्न केलं.

4 / 7
पोनी वर्मा असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. प्रकाश यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दुसरं लग्न करण्यापूर्वी त्यांनी या दोन्ही मुलींची परवानगी घेतली होती.

5 / 7
"पोनी माझ्या चित्रपटासाठी कोरिओग्राफर म्हणून काम करत होती. मी माझ्या घरी तिच्याविषयी सांगितलं आणि तिच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. लग्नापूर्वी पोनी आणि माझ्या मुलींची भेट करून दिली. मुलींच्या परवानगीनंतरत आम्ही लग्नाचा निर्णय पक्का केला", असं प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

6 / 7
गेल्या वर्षी प्रकाश राज यांनी पोनीशीच पुन्हा एकदा लग्न केलं.  24 ऑगस्ट 2021 रोजी लग्नाची या दोघांच्या लग्नाला 11 वर्षे पूर्ण झाली. 'आज रात्री आम्ही पुन्हा लग्न केलं. कारण आमचा मुलगा वेदांतला आमचं लग्न पाहायचं होतं', असं कॅप्शन देत त्यांनी पत्नीसोबतचा फोटो पोस्ट केला होता.

7 / 7
‘सिंघम’, ‘दबंग’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘वॉटेंड’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी भूमिका साकारल्या आहेत.