
सध्या बॉलिवूडची देसी गर्ल निक जोनससोबत घरीच धमाल करतेय. प्रियंकानं नुकतंच काही क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांका चोप्राने पती निक जोनससोबत एक मजेदार फोटो शेअर केला आहे, जिथे निक तिच्या बॉडीवर 'स्नॅक्स' करताना दिसतोय.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचा स्पेशल फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

प्रियांचा आणि निकचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना या दोघांचा हा फोटो आवडला आहे तर अनेकांनी निक आणि प्रियांची खिल्ली उडवली आहे.

निक आणि प्रियांकाचं 2018 मध्ये भारतात लग्न झालं होतं. असं म्हटलं जातं की हे भारतातील 10 रॉयल वेडिंग्जपैकी एक होतं. अशा परिस्थितीत, सध्या प्रियंका चोप्रा लंडनमध्ये तिच्या पुढील वेब सीरिजसाठी शूट करत आहे.