
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रियांका जरी भारतामध्ये राहत नसली तरीही आपल्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, याची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते.

तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वी भारतामध्ये आली होती. यावेळी तिने मुंबईच्या रस्त्यांचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत मुंबई मेरी जान म्हटले होते.

प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती हिला घेऊन भारतामध्ये आली नसल्याची चर्चा होती. प्रियांका चित्रपटाच्या कामासाठी भारतामध्ये आली असल्याचे सांगण्यात आले होते.

नुकताच प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर मुलगी मालती हिच्यासोबतचे खास तीन फोटो शेअर केले आहेत. मात्र, नेहमीप्रमाणेच प्रियांकाने मालतीचा चेहरा हा लपवला आहे.

रविवारी मुलगी मालती आणि पती निक जोनास याच्यासोबत चांगला वेळ प्रियांका चोप्रा हिने घालवला आहे. याचेच फोटो तिने शेअर केले असून एका फोटोमध्ये ती समुद्र किनारी देखील दिसत आहे.