
सायली संजीवला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तिचे आज महाराष्ट्रभर लाखो फॅन्स आहेत. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील स्टार अभिनेते अशोक सराफ हे तिला मुलगी समजतात.

अशोक सराफ आणि सायली संजीव यांच्या वडील आणि मुलगी या नात्याबाबत बोलताना तिने एक खास किस्सा सांगितला आहे. तिचासुमन मराठी म्यूझिक या यूट्यूब चॅनेवर आम्ही असं ऐकलंय हा पॉडकास्ट प्रसिद्ध झालेला आहे. या पॉडकास्टमध्ये तिने हा किस्सा सांगितला आहे.एका व्यक्तीला मी अशोक सराफ यांची खरी मुलगी आहे, असे वाटले होते. ते मला ओरडलेही होते, अशी आठवण तिने सांगितली आहे.

मी एका इन्हेन्टला गेले होते. तिथे मला एक ग्रहस्थ भटले होते. त्यांना हो म्हणाले आणि मी त्यांची मानलेली मुलगी आहे असे त्यांना सांगितले. त्यांना विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा विचारले की तू त्यांची खरी मुलगी आहेस ना? त्यांच्या या प्रश्नावर हो मी त्यांची मुलगीच आहे. ते मला मुलगी समजतात, असे त्यांना सांगितले असे सायली संजीवने सांगितले.

तसेच, तरीही त्यांना विश्वासच बसेना. माझे खरे आई-वडील वेगळे आहेत, असेही त्यांना सांगितले. तरीही ते तू अशोक सराफांचीच मुलगी आहेस, असे ते मला सांगत होते. मी त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांचे नाव संजीव आणि माझ्या आईच नाव शुभांगी आहे. हे सांगताच ते माझ्यावर ओरडले, अशी आठवण सायली सांजीवने सांगितली.

तसेच पुढे बोलताना ती व्यक्ती म्हणाली की हे शक्यच नाही. तू निवेदिता आणि अशोक सराफांची मुलगीच आहेस, असे ते म्हणत होते. त्यांना माझं ऐकायचंच नव्हतं. मग मिही त्यांच्याशी वाद न घालता त्यांच्या मताशी सहमत झाले. ही गोष्ट पुण्याची आहे, अशी माहितीही सायली संजीव हिने दिली. विशेष म्हणजे ती हा किस्सा अगदी हसत-हसत सांगत होती.

सायली संजीव आणि अशोक सराफ. (सर्व फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)