
गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी शुक्रवारी म्हणजेच 16 जुलैला लग्नगाठ बांधली. गेले अनेक दिवस या दोघांचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मात्र आता त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर दोघांनी रिसेप्शन पार्टी दिली होती ज्यात अनेक टीव्ही सेलेब्सनी हजेरी लावली होती. यादरम्यान राहुल आणि दिशा अत्यंत सुंदर लूकमध्ये दिसले.

राहुल आणि दिशा दोघांनीही सिल्व्हर रंगाचे कपडे परिधान केले होते. राहुलनं सिल्व्हर ब्लेझर, ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पँट परिधान केलं होतं. दिशानं सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली होती.

राहुल आणि दिशा एकत्र खूप गोंडस दिसत होते. दोघांनीही पार्टीपूर्वी फोटोशूट केलं, ज्याचे फोटो पाहताना तुम्हालाही आनंद होईल.

खतरों के खिलाडीच्या शूटिंग दरम्यान झालेले मित्रही राहुलच्या लग्नाला उपस्थित होते. अनुष्का सेननं राहुल आणि दिशासोबत एक फोटो शेअर केला आहे.

राहुल वैद्यचा मित्र अली गोनी गर्लफ्रेंड जस्मीन भसीनसोबत पार्टीत आला होता. अली आणि जस्मीन एकत्र खूप सुंदर दिसत होते.