
राज कुंद्रा याचं शिल्पा शेट्टी हिच्यासोबत दुसरं लग्न आहे. राज याने पत्नी शिल्पा हिला अनेक महागड्या वस्तू दिल्या आहेत. साखरपुड्यात राज याने पत्नी शिल्पा हिला तीन कोटी रुपयांचा अंगठी दिली होती.

राज याने परदेशात देखील शिल्पा हिच्यासाठी प्रॉपर्टी घेतली आहे. राज याने भेट म्हणून बुर्ज खलिफा येथे एक घर शिल्पाला दिलं होतं. पण शिल्पाने घर विकलं.

राज याने यूके याठिकाणी देखील ७ बेडरुम असलेल्या व्हिला खरेदी केला. ज्याचं नाव शिल्पा हिने 'राजमहल' ठेवलं आहे. राज याने शिल्पा हिला अनेक महागड्या गाड्या देखील गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये 4 BMW आहेत. सध्या सर्वत्र शिल्पा आणि राज यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

राज कुंद्रा याच्या ट्विटवर अद्याप शिल्पा शेट्टी हिने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, राज कुंद्रा तुरुंगात असताना शिल्पा शेट्टी पतीकडून घटस्फोट घेईल अशी चर्चा देखील रंगली होती.

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे तुरुंगात असताना शेल्पा शेट्टी हिने अनेक वाईट प्रसंगांचा सामना केला. शिल्पा कायम पतीसाठी पुढाकार घेताना दिसली. या प्रकरणावर लवकरच UT69 सिनेमा प्रदर्शित होणार आहे.