
सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड जवळची वाटू लागली. अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात मालिकांचं एक वेगळं स्थान असतं. कालांतरानं आवडत्या मालिका आवडते कलाकार त्यांच्या आयुष्यात होणारे बदल आपलेसे वाटायला लागतात.आपल्या आवडत्या मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.

तर स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आता चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आईचं सुख मिळवण्यासाठी नेहमी धडपडणारी दीपा आता स्वत: आई झाली आहे.

मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिनं ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला.

अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता दीपाच्या आयुष्यात महत्त्वाचं वळण आलं आहे. ती आई झाली आहे. मात्र आता कार्तिक या चिमुकल्या लेकीला आपलं मानायला तयार नाहीये. त्याच्या म्हणण्यांनुसार ती मुलगी त्याची नाहीये. आता दीपाच्या आयुष्यात नेमकं काय वळण येणार हे पाहण्यासारखं असणार आहे.