
तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रंभा आहे. रंभा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीतील गाजलेलं नाव आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडसोबतच साऊथ सिनेविश्वात देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रंभा हिने सलमान खान रजनीकांत यांच्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. अभिनेत्री म्हणाली, रजनीकांत यांच्यासोबत 'अरुणाचलम' सिनेमाची, तर सलमान खान याच्यासोबत 'बंधन' सिनेमाची शुटिंग करत होती. दोन्ही सिनेमांची शुटिंग हैदराबाद याठिकाणी सुरु होतीं

शुटिंग दरम्यान, जेव्हा रंभा हिने सलमान खान याला मिठी मारली तेव्हा, रजनीकांत यांनी पाहिलं. तेव्हा रजनीकांत नाराज झाले आहेत... असं अन्य एका व्यक्तीने अभिनेत्रीला सांगितलं.

तेव्हा रजनीकांत यांनी अभिनेत्रीला, 'सलमान खान याला ता मिठी मारली असा प्रश्न देखील विचारला...' यावर अभिनेत्री म्हणाली, 'फॉर्मेलिटी म्हणून मिठी मारली...' सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रंभा हिची चर्चा रंगली आहे.

एक काळ असा होता जेव्हा रंभा हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत रंभा हिने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे.