
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई हिला खरी ओळख बिग बाॅस 13 मधून मिळालीये. इतकेच नाही तर दोन बाॅलिवूड चित्रपटांमध्येही रश्मी देसाई हिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रश्मी देसाई ही पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असले तरीही रश्मी देसाई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

नुकताच रश्मी देसाई हिने खास एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. रश्मी देसाईच्या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई हिचा लूक अत्यंत बोल्ड दिसत आहे. या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई हिने पांढऱ्या रंगाचा डीप नेक टॉप घातला आहे.

विशेष म्हणजे रश्मी देसाई हिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत. या फोटोशूटवर काही टीव्ही अभिनेत्रींनी देखील कमेंट करत रश्मीच्या लूकचे काैतुक केले आहे.