नव्या ‘शेवंता’चा बोल्ड अंदाज पाहून जुनीलाही विसराल, सोशल मीडियावर होतेय फोटोंची चर्चा!

| Updated on: Nov 27, 2021 | 3:56 PM

‘शेवंता’ बदलणार हे कळल्यानंतर कोणती नवी अभिनेत्री ही भूमिका साकारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अभिनेत्री कृतिका तुळसकर या मालिकेत ‘शेवंता’ साकारणार असल्याचे कळताच सोशल मीडियावर देखील तिच्याबद्दल सर्च केले जाऊ लागले.

1 / 5
कोकणातील जीवनशैली, भाषा, तेथील भूताटकी यावर सुरु असलेली झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील सर्वच पात्रं आपापली भूमिका उत्तम निभावत आहेत. मात्र या मालिकेच्या तीनही सिझनमध्ये प्रेक्षकांना वेड लावले ते ‘शेवंता’ने.

2 / 5
मालिकेत शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने निभावली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने अपूर्वाने शेवंताची भूमिका सहज निभावली आहे. मात्र यापुढे अपूर्वा नेमळेकर या मालिकेत दिसणार नाही. काही ज्युनियर सहकलाकारांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे अपूर्वाने ही मालिक सोडण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.

3 / 5
अभिनेत्री कृतिका तुळसकर ही गेली 18 वर्षे रंगभूमीच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात कार्यरत असून, तिने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कृतिका एक उत्तम नृत्यांगना असून, ती कथ्थक विशारद देखील आहे. पेशाने सायकॉलॉजिस्ट असलेली कृतिका आपली आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळली होती. तिने ‘बबन’, ‘विजेता’, ‘पाशबंध’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

4 / 5
‘शेवंता’ बदलणार हे कळल्यानंतर कोणती नवी अभिनेत्री ही भूमिका साकारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अभिनेत्री कृतिका तुळसकर या मालिकेत ‘शेवंता’ साकारणार असल्याचे कळताच सोशल मीडियावर देखील तिच्याबद्दल सर्च केले जाऊ लागले. कृतिकाने सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड पाहून आता प्रेक्षक आणि चाहते ‘जुनी शेवंता विसराल’ असं म्हणत आहेत.

5 / 5
आधी ‘शेवंता’ साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने आपले सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवरुन मालिका का सोडली याबाबत खुलासा केला आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केले. परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल आणि माझ्या अवहेलना होत असेल. नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर अशा ठिकाणी काम करणे आपल्या तत्वात बसत नसल्याचे अपू्र्वाने म्हटले आहे. तसेच एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका करताना मजा आली, समाधान मिळाले. शेवंताची भूमिका आपल्याला खूप काही देऊन गेली. ‘शेवंता’ म्हणून आपली एक ओळख आणि जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले, असेही तिने नमूद केले.