
सुशल्या म्हणजेच सुशीला हिला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. सुशल्या भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी आता काय करते फार कमी लोकांना माहिती आहे.

ऋतुजा 'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्ये दिसली. पण दुखापत झाल्यानंतर अभिनेत्री शोमधून बाहेर झाली. त्यानंतर ऋतुजा कुठे दिसलीच नाही.

फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ऋतुजा आता पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सांगायचं झालं तर, ऋतुजा हिने सध्य स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित केलं आहे. तिचे वर्कआऊटचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

ऋतुजा अध्यात्मिक वाटेवर वाटचाल करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री फोटो देखील पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऋतुजा हिची चर्चा रंगली आहे.