
नुकताच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा पार पडलाय. या पुरस्कार सोहळ्यात अनेक बाॅलिवूड स्टारने हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आता व्हायरल होत आहेत.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारामध्ये सर्वांच्या नजरा या अभिनेत्री रेखा यांच्याकडे होत्या. केसात गजरा, सिंदूर आणि साडीमध्ये रेखा यांचा लूक जबरदस्त दिसला.

गोल्डन रंगाच्या साडीसोबतच रेखा यांनी कानामध्ये मोठे झुमकेही घालते होते. गोल्डन रंगाच्या साडीमध्ये रेखा यांचा लूक सुंदर दिसत होता. यासोबतच रेखा यांनी एक मॅचिंग पर्सही कॅरी केली होती.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये आलिया भट्ट हिने देखील हजेरी लावली होती. रेखा यांच्यासोबत आलिया भट्ट हिचे देखील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
