
सुपरस्टार सलमान खान याने 2010 मध्ये एक वर्षाच्या मुलीका बोम मॅरो दान केलं होतं. तो अनेक सामान्य लोकांना मदत करतो. पण अनेकांना माहित नसेल की सलमान खानने बोन मॅरो दान केलं आहे. असं करणारा तो भारतातील पहिला व्यक्ती ठरला आहे. पूजा नावाच्या चिमुरडीला सलमानने बोन मॅरो दान केलं होतं.

कन्नट अभिनेता पुनीत राजकुमार याने मृत्यूनंतर नेत्रदान केलं आहे. 29 ऑक्टोबर 2021 मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

अभिनेता विजय देवरकोंडा याने देखील अवयव दान केलं आहे. 'लायगर' फेम अभिनेत्याने हैदराबादमधील एका रुग्णालयात एका कार्यक्रमादरम्यान अवयव दान करण्याचं वचन दिलं.

अभिनयापासून दूर असलेल्या आमिर खान याने देखील मृत्यूनंतर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे, राणी मुखर्जी हिने देखील नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. निळ्या डोळ्यांमुळे ऐश्वर्याचं सौंदर्य फुलून दिसतं. अभिनेत्रीने अनेक वर्षांपूर्वी डोळे आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाला दान करण्याचं आश्वासन दिलं आहे.