
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसची स्पर्धक आणि अभिनेत्री सना खान ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सना खान हिने तिचा एक्स बॉयफ्रेंड कोरिओग्राफर मेल्विन लुईस याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.


सना खान म्हणाली की, मेल्विन लुईस याच्यामुळे एक मुलगी प्रेग्नेंट राहिली आणि त्याने अनेकदा त्याच्या विद्यार्थिनीचा विनयभंग देखील केलाय. सना खान हिचे आरोप ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

पुढे सना खास म्हणाली की, मेल्विन लुईस हा सुरूवातीचे चार महिने खूप जास्त चांगला राहिला. मात्र, त्यानंतर त्याने आपल्याला धोका देण्यास सुरूवात केली. सना म्हणाली, माझ्या पैशांवर त्याची नजर होती.

पुढे सना खान म्हणाली की, लोकांशी बोलण्यास आणि प्रोजेक्ट घेण्यासाठी त्याने मनाई केली होती. तो मला सतत धोका देत असल्याचे सांगताना सना खान ही ढसाढसा रडताना देखील दिसली.