
अभिनेत्री सारा अली खान हिने कमी वयात आणि फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. सारा सोशल मीडियाच्या माध्यामातून स्वतःबद्दल अनेक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आता देखील सारा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री न्यूयॉर्क याठिकाणी फिरताना दिसत आहे. सोशल मीडियावर साराचे फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे नाहीतर स्वभावामुळे देखील अनेकांना आवडते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांसोबत देखील अभिनेत्री फोटो आणि सेल्फी क्लिक करत असते.