
रणवीर सिंग त्याच्या टीव्ही शो 'द बिग पिक्चर'च्या स्टेजवर अतिशय अनोख्या शैलीमध्ये दिसला. त्याचा शो हळूहळू खूप लोकप्रिय होत आहे. रणवीर सिंगसोबत सारा अली खान आणि जान्हवी कपूरही स्टेजवर दिसल्या. दोघीही वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होत्या.

आता सारा अली खाननं जान्हवी कपूरसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघीही कमालीच्या सुंदर दिसत आहे.

या फोटोसोबत सारानं सुंदर कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं, 'Real princesses fix each other’s crowns ?'

या फोटोंमध्ये जान्हवी गुलाबी रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसतेय. तर सारानं काळ्या रंगाचा हटके ड्रेस परिधान केला आहे.

दोघींचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.