
रणवीर सिंग त्याच्या टीव्ही शो 'द बिग पिक्चर'च्या स्टेजवर अतिशय अनोख्या शैलीमध्ये दिसला. रणवीर फोटोग्राफर्ससाठी ब्लॅक कलरचा सूट परिधान करून दिसला. त्याचा शो हळूहळू खूप लोकप्रिय होत आहे.

रणवीर सिंगसोबत सारा अली खान आणि जान्हवी कपूरही स्टेजवर दिसल्या. दोघीही वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होत्या.

या दरम्यान, रणवीरने फोटोग्राफर्सला नाराज केलं नाही आणि पूर्ण उर्जा घेऊन फोटोसाठी त्यानं पोज दिल्या.

सारा अली खान आणि जान्हवी कपूरने रणवीरसोबत खूप मजा केली.

रणवीर सिंगने द बिग पिक्चर या शोद्वारे टीव्हीवर पदार्पण केलं आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही येत आहेत.

त्याच्या पहिल्या शोच्या पहिल्याच भागात रणवीरने आपल्या ऊर्जेने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रणवीरचा हा शो पुढे अधिक मनोरंजक असणार आहे.