
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमाला बाॅलिवूडच्या अनेक स्टारने हजेरी लावली. आता या कार्यक्रमामधील एक खास व्हिडीओ समोर आलाय.

यामध्ये पठाण चित्रपटातील गाण्यावर शाहरुख खान हा जबरदस्त असा डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत रणवीर सिंह आणि वरूण धवन हे देखील डान्स करताना दिसत आहेत.

झूमे जो पठान या गाण्यावर हे डान्स करत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना यांचा डान्स प्रचंड आवडलाय. झूमे जो पठान या गाण्यावर शाहरुख खान याचा डान्स पाहून चाहते उत्साही झाले आहेत.

विशेष म्हणजे डान्स करताना हुक स्टेप करताना शाहरुख खान हा दिसला. पठाण चित्रपट शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत लकी ठरलाय. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत.

शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट आहे. या चित्रपटाला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. आता शाहरुख खान याचा हा डान्स चाहत्यांना आवडलाय.