
'बिग बॉस ओटीटी'ची सुरुवात धमाकेदार कनेक्शननं झाली आहे, ज्यात चाहत्यांनी शमिता शेट्टी आणि राकेश बापटच्या कनेक्शनला पसंती दर्शवली आहे. राकेश आणि शमिता घरात पूर्णपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात.

या दोघांना घरात काही दिवस झाले आहेत, मात्र शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील संबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आधी घरातील अनेक स्पर्धक त्यांना पती -पत्नी म्हणत होते.

अलीकडेच राकेश बापट देखील शमिता शेट्टीसोबत फ्लर्ट करताना दिसला. एवढंच नाही तर तो शमिताला किससुद्धा करतो.

समोर आलेल्या फोटोंमध्ये, हे पाहिले जाऊ शकते की तो शमिताला गुड मॉर्निंग किस देत आहे आणि तिला उठवत आहे. राकेशनं काळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे, राकेश तिच्या हातावर किस करतो आहे.

चाहत्यांना राकेश बापट आणि शमिताची स्टाईल खूप आवडते. चाहत्यांनाही सध्या दोघांना एकत्र पाहणं पसंत आहे.

नुकतंच असं दाखवण्यात आलं की राकेश शमिताच्या बेडवर जातो आणि ती राकेशला तिच्या बेडवर येण्यास सांगते. राकेश शमितासोबत जोक्स करतो.