
टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने अली बाबा मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. यानंतर शीजान खान याचे नाव प्रचंड चर्चेत आले.

तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक केली. जवळपास तीन महिने शीजान खान याला जेलमध्ये राहण्याची वेळ आली.

काही दिवसांपूर्वीच शीजान खान हा जेलबाहेर आलाय. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजान खान याला अली बाबा मालिकेतून बाहेरचा रस्ता हा दाखवण्यात आला. मात्र, शीजान लगेचच टिव्हीवर पर्दापण करत आहे.

शीजान खान हा खतरो के खिलाडी 13 मध्ये दिसणार आहे. खतरो के खिलाडी 13 मध्ये दणदणीत असे पदार्पण करण्यास शीजान खान हा तयार आहे. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.

खतरो के खिलाडी 13 मध्ये शीजान खान, शिव ठाकरे, अर्चना गाैतम हे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शीजान खान हा तुनिशा शर्मा हिच्याबद्दल काय खुलासे करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.