
सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकताच सोनाक्षी हिने सोशल मीडियावर एका व्हिडीओ पोस्ट केला. ज्यमध्ये अभिनेत्री नवं घर सजवताना दिसली.

सोनाक्षी हिने घराची एक भिंत पूर्ण झहीर याच्यासोबत असलेल्या फोटोंनी सजवलेली आहे. लग्नानंतर सोनाक्षी तिच्या संसार व्यस्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

व्हिडीओ शेअर करत सोनाक्षी म्हणाली, 'स्वतःचं घर तयार करत आहे...' अभिनेत्रीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत झहीर म्हणाला, 'तूच माझं घर आहेस...'

झहीर आणि सोनाक्षी कायम एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सोनाक्षी - झहीर यांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 23 जून रोजी रजिस्टर्ड पद्धतील लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.