
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी येत्या 23 तारखेला बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्ना करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ज्यामुळे दोघांच्या अनेक गोष्टी देखील समोर येत आहे.

सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोनाक्षी स्वतः बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत असते.

सोनाक्षी हिच्या वाढदिवशी झहीर याने खास अंदाजात अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. इजहार-ए-बयां करत झहीर याने सोनाक्षी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

‘हीरामंडी’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षी हिने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये लग्नासाठी उत्सुक आहे… असं वक्तव्य केलं होतं. अखेर सोनाक्षी लनकरच नवरी होणार आहे.

सोनाक्षी हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री पूर्वी अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.