
महाराष्ट्राची लाडकी अप्सरा... अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी... सोनालीला आपण सिनेमांमध्ये पाहिलं आहे. पण आता ती एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवा कोरा रिअॅलिटी शो घेऊन सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा' असं या कार्यक्रमाचं नाव आहे. सन मराठीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

'होऊ दे चर्चा' हा एक रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात अनेक पाहुणे कलाकार हजेरी लावणार आहेत. सिनेमांचं प्रमोशन होणार आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असणार आहे.

'होऊ दे चर्चा' या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. यात 'घरत गणपती' सिनेमातील कलाकार आले होते. अश्विनी भावे आणि अजिंक्य देव या कार्यक्रमात आले होते. या सिनेमातील कलाकारांशी सोनालीने बातचित केली.

दर रविवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम सन मराठी चॅनेलवर पाहता येणार आहे. सोनालीला या आधी सिनेमात अभिनय करताना किंवा डान्स करताना आपण पाहिलं आहे. पण ती आता रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.